मराठी रियासत.कॉममराठी रियासत हे एक महान ऐतिहासिक सत्य आहे. एका छोट्याश्या मावळ प्रांतातून निर्माण होऊन एका साम्राज्यात रुपांतरीत झालेली, पेशावरपासून ते तंजावर पर्यंत फ़ैलाव झालाली एक दणकट रियासत. मवाळ समजल्या गेलेल्या मराठी माणसांत एक मावळाही लपलेला असतो याचा प्रत्यय जगाला या रियासतीने दिला. 


 
             
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी रियासतीने सुमारे दीड शतक महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली. या रियासतीची माहिती आताच्या तरुणांना मिळावी म्हणून ही वेबसाईट या वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते शाहू महाराजांपर्यंत सर्वांची चरित्रे असतील. त्याचबरोबर या रियासतीसाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या सुमारे तिनशॆ मावळ्यांचा पूर्ण परिचय करून देणार्‍या पुस्तिकाही असतील. यात बाजी पासलकरांपासून ते तानाजी, धनाजी, संताजी, जीवा महाला, बाजी प्रभू देशपांडे तसेच पेशवाईतील अनेक नररत्नांची माहिती असेल. या शिवाय दुर्ग दुर्गट भारी या सदराखाली महाराष्ट्रातील २८० किल्ल्यांची इत्थंभूत माहिती असेल. मराठी साम्राज्य दक्षिणेपासून ते अटकेपार पसरले होते. या काळात झालेल्या सर्व लढाया, व तहांची माहिती असेल. तसेच गनिमी कावा या शिवरायांनी विकसित केलेल्या आणि आता जगभर वापरल्या जाणार्‍या युद्धतंत्राची पूर्ण माहिती यातील एका पुस्तकात असेल. अशा तर्‍हेने मराठेशाहीच्या सर्व अंगांची इत्थंभूत माहिती देणारी ही मेगा वेबसाईट ४० लेखक व इतिहासतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनवली जात आहे.