गनिमी कावा - युध्दतंत्र


आपल्याहून बलिष्ठ असलेल्या शत्रूला चारी मुंड्या चित करून हतबल अवस्थेत घरी किंवा देवाघरी धाडण्याच्या युद्धतंत्राला छत्रपती शिवरायांनी नांव दिलं गनिमी कावा. तंत्र म्हणजे शास्त्र. महाराजांनी या युद्धाचं एक शास्त्र बनवलं. आणि आपल्याहून बलिष्ठ अशा चार चार शाह्यांना संपवून किंवा जरबेत ठेवून त्यांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
हे तंत्र वापरण्याचे काही नियम आहेत. जसे की... दुसर्‍यावर हल्ला करण्यासाठी हे वापरता येत नाही. तर स्वतःच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच हे असते. याचा वापर दीन दुबळ्यांना त्रास देण्यासाठी नाही करता येत. पण दुबळ्यातला दुबळ्याला याचा वापर करून बलिष्ठांना नमवता येते. यासाठी स्वतःच्या भौगोलिक  प्रदेशाच्या रचनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही लढाई जनतेच्या पाठबळावरच लढता येते.
या तंत्राचा वापर करून जगात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य युद्ध लढली गेली. चीन , व्हिएतनाम, क्युबा, इस्त्रायल अशा शेकडो प्रदेशांत जनतेने स्वतःला मुक्त करताना हे तंत्र वापरले.
हे तंत्र आपल्या प्रदेशात जन्माला आले याचा आम्हाला अभिमान आहे.
या विषयावरील पुस्तके लवकरच या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जातील.